Breaking News

राज्यसभा सचिवालयात 115 पदांची भरती

नवी दिल्ली, दि. 28, जुलै - राज्यसभा सचिवालयात 115 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये पदवीधर व पदव्युत्तर उमेदवारांना  ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
यामध्ये संसदीय दुभाषी (इंग्रजी / हिंदी), सहाय्यक विधान / समिती/ राजशिष्टाचार / कार्यकारी अधिकारी, लघुलेखक (इंग्रजी), सुरक्षा सहाय्यक श्रेणी 2,  सचिवालय सहाय्यक (इंग्रजी, हिंदी, उर्दू), अनुवादक व भाषा तपासक या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.