Breaking News

मुंबई विमानतळावर 25 लाखाच्या सोन्यासह 1 जण अटकेत

मुंबई, दि. 28, जुलै - मुंबई विमानतळावर 25 लाख रुपयांच्या सोन्यासह एकाला अटक करण्यात आली. हे सोने एका मिस्करमध्ये लपवून नेले जात होते. जप्त  करण्यात आलेले सोने 860 ग्रॅम इतके असून त्यांचे बाजार मूल्य 25 लाख 37 हजार इतके आहे. मोहम्मद रिसद असे आरोपीचे नाव आहे. तो दुबईहून मुंबईत आला  असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, रिसद याने मिक्सरमध्ये सोने गोल आकारात करून लपवले होते. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून त्याला अटक  केली. यापूर्वीही कोलगेटमधून सोने लपवून नेणा-याला अटक करण्यात आली होती.