Breaking News

251 रूपयांत मोबाईल देण्याची घोषणा करणारी रिंगिंग बेल ’ईडी’च्या रडारवर

नवी दिल्ली, दि. 29, जुलै - 251 रूपयांत मोबाईल देणार असल्याचा दावा करणारी रिंगिंग बेल कंपनीविरोधात सक्तवुसली संचलनालय चौकशी करणार आहे.  कोट्यवधी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप कंपनीवर आहे. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे संचलनालयाच्या एका अधिका-याने माहिती मागितली आहे.
फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोहित गोयल यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी गोयल यांना अटक  ही करण्यात आली होती.