Breaking News

बिहारमध्ये 27 मंत्र्यांनी घेतली पद व गोपनीयतेची शपथ

पाटणा, दि. 30, जुलै - बिहारमध्ये नव्या सरकार स्थापनेनंतर आज संयुक्त जनता दलाच्या 14 आणि भाजप व सहकारी पक्षांच्या 13, अशा एकूण 27 आमदारांनी  मंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात पार पडलेल्या या कार्यक्रमात राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी सर्व मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
यामध्ये संयुक्त जनता दलाच्या बिजेंद्र कुमार यादव, राजीव रंजन सिंग, श्रवण कुमार, जय कुमार सिंग, कृष्णनंदन वर्मा, महेश्‍वर हजारी, शैलेश कुमार, मंजू वर्मा, संतोष  निराला, खुर्शीद उर्फ फिरोज अहमद, मदन साहनी, कपिल देव कामत, दिनेश चंद्र वर्मा, रमेश ऋषिदेव, भाजपच्या प्रेम कुमार, नंद किशोर यादव, रामनारायण मंडल,  प्रमोद कुमार, विनोद नारायण झा, सुरेश शर्मा, विजय सिन्हा, राणा रणधीर सिंग, विनोद कुशवाहा, मंगल पांडेय, कृष्ण कुमार ऋषी, बृजकिशोर बिंद व लोकजनशक्ती  पक्षाचे पशूपती पारस या आमदारांचा समावेश आहे.
या शपथविधी कार्यक्रमाला मुख्यमंत्री नितीश कुमार व केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान उपस्थित होते.