Breaking News

गुजरातच्या समुद्रकिनारी तब्बल 3,500 कोटींचं ड्रग्ज जप्त

पोरबंदर, दि. 30, जुलै - गुजरातच्या समुद्रात एका छाप्यात तब्बल 3 हजार 500 कोटींचं ड्रग्ज पकडण्यात आलं आहे. भारतीय कोस्ट गार्डनं कारवाई करत या ड्रग्ज  तस्करांच्या जहाजावर छापा मारला आहे. या छाप्यात जहाजामधून तब्बल 1 हजार 500 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. एमव्ही हेन्री नावाचं हे जहाज असून 3  दिवसांच्या अथक परिश्रमानंतर कोस्टगार्डनं हे जहाज शोधलं आणि त्याच्यावर छापा मारला. समुद्रात पकडलं गेलेला हा सर्वाधिक ड्रग्जचा साठा आहे. जहाज  पकडल्यानंतर त्याला आता गुजरातच्या पोरबंदर पोर्टवर नेण्यात आले आहे.