0
अहमदाबाद, दि. 29, जुलै - गुजरातमध्ये काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामे दिल्यानंतर पक्षात आणखीन फूट पडू नये म्हणून काँग्रेसने आपल्या 40 आमदारांना  विमानाने बंगळुरूला पाठवले. रात्री उशीरा 31 आमदार इंडिगोच्या विमानाने अहमदाबादहून बंगळुरूला पोहोचले आहेत. यानंतर 9 आमदार राजकोट येथून पहाटे 5  वाजता बंगळुरूला पोहोचले आहेत. राज्यसभा निवडणुकीपर्यंत आमदारांना बंगळुरूमधील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात येणार आहे.
काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा भारतीय जनता पक्षाचा डाव यशस्वी होऊ नये म्हणून काँग्रेसने आपल्या 40 आमदारांना बंगळुरूला पाठवले आहे, अशी माहिती काँग्रेसच्या  एका आमदाराने दिली आहे.
गुजरातमध्ये पुढील महिन्यात राज्यसभेच्या 3 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. त्या आधीच काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसला  मोठा धक्का बसल्याचे समजते.

Post a Comment

 
Top