0
नवी दिल्ली, दि. 30, जुलै - सैन्य दलात 52 हजार सैनिकांची कमतरता आहे, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी लोकसभेत दिली.
भारतीय सैन्य दलात 25 हजार 472 संयुक्त कमांड अधिका-यांसह अन्य पदांवरील अधिका-यांची कमतरता आहे. सध्या सैन्य दलात 14 लाख सक्रीय जवान  आहेत. वायुदलात 13 हजार 383 वायुसैनिक, नौदलात 13 हजार 785 नौसैनिकांची आवश्यकता आहे. अशी एकूण 52 हजार 640 जवानांची संख्या कमी  असल्याचे भामरे यांनी सांगितले.
चीन व पाकिस्तान यांसारख्या देशांशी युद्ध करण्यासाठी भारताकडे केवळ दारूगोळाच नाही, तर 52 हजारांहून अधिक सैनिक कमी आहेत, असेही भामरे म्हणाले.
सरकारने जवानांची संख्या वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. यामध्ये प्रशिक्षण क्षमतेत वाढ, शाळा, महाविद्यालयांतून प्रोत्साहनपर व्याख्याने,  करिअर मेळावे, प्रदर्शने, सशस्त्र दलांत आव्हानात्मक करिअर निवडण्यासाठी तरुणांमध्ये प्रचार अभियान आदींचा समावेश आहे, असेही भामरे यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top