Breaking News

पुण्यात 70 वर्षीय वृद्धेकडून 1 कोटींच्या जुन्या नोटा जप्त

पुणे, दि. 28, जुलै - पुण्यात सत्तर वर्षीय वृद्धेकडून 1 कोटींच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या. इस्टेट एजंट असलेल्या गीता शहा डेक्कन भागात जुन्या नोटा  बदलण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. एफसी रोडवर शहा रिक्षातून आल्या असताना पोलिसांनी नोटा जप्त केल्या. डेक्कन पोलिसांनी ही  कारवाई केली. जप्त केलेल्या नोटा प्राप्तीकर विभागाकडे सोपवल्या जातील आणि पुढची चौकशी प्राप्तीकर विभागाकडून होईल, अशी माहिती यावेळी पोलिसांनी दिली  आहे.