Breaking News

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुलास 70 हजार रुपयांपर्यंत कर्ज - दादाजी भुसे

मुंबई,दि. 29  : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणार्‍या घरकुलासाठी मागणी केल्यास अनुदानाशिवाय अतिरिक्त 70 हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन दिले जाईल, अशी माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानपरिषदेत दिली.
श्री. भुसे पुढे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांला 269 चौ.फूट जागेवर घरकुल बांधण्यासाठी एक लाख 20 हजार एवढे अनुदान देण्यात येते. या व्यतिरिक्त स्वच्छ भारत अभियानातून शौचालय बांधकामासाठी 12 हजार रुपये व महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून 18 हजार असे एकूण दीड लाख रुपये अनुदान देण्यात येते. याशिवाय घरकुल बांधण्यासाठी रक्कम हवी असल्यास 70 हजार रुपये पर्यंतचे कर्ज बँकेमार्फत देण्यात यावेत, अशा सूचना सर्व बँकर्संना देण्यात आल्या आहे.उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री आनंदराव पाटील, धनंजय मुंडे आदींनी प्रश्‍न उपस्थित केला होता.