Breaking News

क्रीडा मंत्री विजय गोयल यांच्याकडून भारतीय महिला क्रिकेट संघाचा सत्कार

नवी दिल्ली, दि. 28, जुलै - क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी आज गुरूवारी दिल्लीत भारतीय महिला क्रिकेट संघाचा सत्कार केला. गोयल यांच्यानंतर भारतीय क्रिकेट  नियामक मंडळाकडूनही भारतीय महिला संघाचा सत्कार होणार आहे. मंडळाकडून संघातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी 50 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.  तसेच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू देखील भारतीय महिला संघाचा सत्कार करणार आहेत.
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिला बीएमडब्ल्यू बक्षीस म्हणून देणार असल्याची घोषणा क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणा  बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष चामुंडेश्‍वरनाथ यांनी केली आहे.