Breaking News

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना पदावरून हटवलं

अकोला, दि. 30, जुलै - अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांची कुलगुरू पदावरून दूर करण्यात आलं आहे.  दुहेरी नागरिकत्व आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून दाणी यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश कुलपती आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिले  आहेत.
डॉ. रविप्रकाश दाणी यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपणार होता. पण त्यापूर्वीच त्यांची दुहेरी नागरिकत्व आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरुन पदावरुन  हाकालपट्टी करण्यात आली आहे. कुलगुरु डॉ. रविप्रकाश दाणी यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश कुलपती आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज दिले.