Breaking News

मराठा समाजाने तनमन धनाने मोर्चात सहभागी व्हावे - प्रा. डी.डी.बच्छाव

जळगाव, दि. 30, जुलै - येत्या 9 ऑगस्ट रोजी मुबंई येथे मराठा समाजाचा मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी महामोर्चा होत असुन जवळपास 60 लाखाहुन  अधिक समाज बाधंव या मोर्चात सहभागी होणार असल्याने त्या पार्श्‍वभुमीवर सकल मराठा समाजाचे मराठा क्रांती मोर्चाचे तसेच मराठा सेवा संघ, मराठा महासंघ सर्व  घटकांतील समाज बांधवाचा एरंडोल तालुकास्तरीय मेळावा प्रा.डी.डी.बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी बोलतांना श्री.बच्छाव यांनी समाज बांधवाना अवाहन केले की, मुबंईत होत असलेल्या मोर्चात समाज बांधवानी तन मन धनाने सहभागी व्हावे.आपली एकजुट  ही भविष्यातील पीढीसाठी उपयुक्त ठरणार आहे.यावेळी विचार पिठावर विलास पाटील,दिपक सुर्यवंशी,सुनिल गरूड अमित पाटील,डॉ.सुरेश पाटील,डॉ.सुभाष देशमुख,  सुदामराव पाटील, डॉ.राजेद्र देसले, संंभाजी इंगळे, संदीप वाघ,अभिजीत पाटील,रवीद्र पाटील,राजेंद्र शिंदे,शालिक पाटील,आदी उपस्थीत होते.
यावेळी तालुक्यातील प्रत्येक गावातुन जास्तीत जास्त समाज बांधवानी मोर्चात उपस्थीत राहण्याच्या दिशेने नियोजन सुरू आहे.पंधरा तालुक्यात संवाद दौरा सुध्दा  सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.मेळाव्याचे प्रास्तावीक अमितदादा पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष किशोर  पाटील यांनी केले.मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पांडुरंग पाटील,शेखर पाटील,ईश्‍वर आबा,डॉ.प्रशांत पाटील,के.डी.आबा पाटील,बापुराव पाटील,दिनेश पाटील,अभय  पाटील,राकेश पाटील,भैया पाटील,किशोर पाटील आदींनी सहकार्य केले.