Breaking News

काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला, तर तिरंग्याच्या रक्षणासाठी कोणीच येणार नाही - मेहबुबा मुफ्ती

जम्मू, दि. 29, जुलै - येथील जनतेला मिळालेल्या विशेषाधिकारामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला तर काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्यासाठी कोणताही नागरिक  राहणार नाही, असे मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितले. येथील आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
घटनेतील कलम 35 अ रद्द करण्यासंबंधी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मुफ्ती बोलत  होत्या. घटनेत जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. जनतेला मिळालेल्या विशेषाधिकारामध्ये जर बदल करण्यात आले तर याचे गंभीर परिणाम  होतील . असे झाल्यास जम्मू-काश्मीरमध्ये तिरंग्याचे रक्षण कोणही करु शकणार नाही, असे मुफ्ती यांनी नमूद केले.