0
औरंगाबाद, दि. 28, जुलै - बद्रिनाथ येथील बस अपघातातील जखमी भाविक सचखंड एक्स्प्रेसने शहरात दाखल झाले असून त्यांची प्रकृती चांगली आहे. ज्यांच्यावर  आणखी उपचाराची गरज आहे अशा भाविकांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले .औरंगाबाद जिल्हयातील फुलंब्री तालुक्यातील भाविक अमनाथ  यात्रेला गेले होते तेंव्हा त्यांची बस पलटी होवून अपघात झाला होता त्यात दोन महिलांचा मृत्यू झाला होता. बाकीचे 35 यात्रेकरू जखमी झाले होते. त्यांच्यावर  बदीनाथ येथे उपचार झाल्यानंतर आज सचखंड एक्स्प्रेसने त्यांना औरंगाबदला आणण्यात आले त्यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्टेशनवर नातेवाईक व हितचिंतकांची गर्दी  झाली होती.अपघातातून बचावलेल्या आपल्या जीवलगांना पाहताच अनेकांचे डोळे भरून आले. 

Post a Comment

 
Top