Breaking News

रोमँटिक पार्टनरशिपसाठी वेळ नाही - झुलन गोस्वामी

नवी दिल्ली, दि. 30, जुलै - आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपचे उपविजेतेपद मिळवणार्‍या भारतीय संघावर सध्या कौतुकाचा तसेच अभिनंदनाचा वर्षाव होतोय.  त्यांना बक्षिसेही जाहीर झालीत. त्यांच्या मुलाखतीही घेतल्या जातायत. या दरम्यानच भारताची गोलंदाज झुलन गोस्वामीला रोमँटिक पार्टनरशिपबद्दल प्रश्‍न विचारण्यात  आला. त्यावर उत्तर देताना झुलन म्हणाली, सध्या मला त्यासाठी वेळ नाहीये.
मी सध्या माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करतेय. त्यामुळे इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नाहीये. एकावेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याकडे माझा कल  असतो, असे झुलन म्हणाली. मी माझ्या फ्रेंड्सना पाहते. दोन्ही गोष्टी एकाचवेळी सांभाळण्यासाठी त्यांना कशी कसरत करावी लागते हे मी पाहिलेय. त्या गोष्टीसाठी  बराच वेळ आहे. मला सिनेमे बघायला तसेच म्युझिक आवडते. सेमीफायनल आणि फायनल मॅचआधीही मी बंगाली सिनेमे पाहिले, असेही पुढे ती म्हणाली.