Breaking News

भ्रष्टाचार भोवला; शरीफ घरी


बहुचर्चित पनामागेट प्रकरणी सुनावणी गेल्याच आठवड्यात संपली, तेव्हापासून पाकिस्तान आणि तेथील पंतप्रधान नवाज शरीफ अस्थिरच होते. आता सर्वोच्च न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं आहे. शरीफ यांना पंतप्रˆधान पदावरुनही हटवण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निणर्यामुळं पाकिस्तानात राजकीय भूकंप झाला आहे. पंतप्रधानपदावर असताना शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परदेशात अवैध संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी न्यायालयानं शरीफ यांना दोषी ठरवलं आहे. न्यायालयाच्या निणर्यानंतर नवाज शरीफ पंतप्रधानपदावरुन पायउतार झाले आहेत. लष्कराला जे अपेक्षित होतं, तेच पाकिस्तानमध्ये झालं आहे. विरोधी पक्षांनीही या मुद्याचं भांडवल केलं होतं. शरीफ यांची राजकीय कारकीर्द सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर संपुष्टात आली आहे. न्यायाधीश एजाज अफजल यांच्या अध्यतेखालील खंडपीठात शेख अजमत सईद आणि इजाजूल एहसान यांचा समावेश होता. तपास पथकानं सादर केलेल्या अंतिम अहवालावरही सुनावणीच्या दरम्यान चर्चा करण्यात आली होती. पनामा प्रकरण हे नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलांशी संबंधित आहे. त्यामुळं सत्तारूढ असलेल्या पीएमएल-एन पार्टीमध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. शरीफ यांची कन्या मरियम हिच्याकडं पंतप्रधानपद सोपविण्याचं घाटत होतं. परंतु, तिच्यावरही आरोप असल्यानं तिचं नावही आता शर्यतीतून बाहेर पडल्यात जमा आहे. नवाज शरीफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पाकिस्तानच्या न्यायालयानं दिले आहेत. नवाज यांच्यासह मुलगी आणि जावई यांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. संपत्तीचा स्त्रोत सांगण्यात शरीफ अपयशी ठरल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं पाकिस्तानच्या नेतृत्वाबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. नवाज यांचे बंधू शहबाज शरीफ यांची पंतपˆधानपदी निवड होण्याची शक्यता आहे. सध्या शहबाज पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री आहेत. न्यायालयाच्या आदेशानं संयुक्त तपास पथकानं या प्रकरणाचा तपास करून अहवाल दिला होता. या अहवालात हा आरोप योग्य असल्याचे सिद्ध झालं होतं. भˆष्टाचार आणि काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं आता शरीफ यांना दोषी ठरवलं आहे. पनामा पेपर लीक प्रकरणाचं वृत्त परदेशी माध्यमांतून आलं होतं. त्यानंतर पाकिस्तानात त्यावर आरोप-पˆत्यारोप होत होते. शरीफ यांनी हे आरोप नाकारले होते. आपल्या कुटुंबीयांच्या उद्योगातून मिळालेल्या संपत्तीतून परदेशात मालमत्ता खरेदी केल्याचं शरीफ सांगत होते; परंतु संयुक्त तपासणी पथकानं त्यांच्यावरच ठपका ठेवला होता. हा अहवाल दहा जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. तपास पथकानं दिलेल्या अहवालात पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासहित त्यांची मुलं हसन नवाज, हुसेन नवाज आणि मुलगी मरीयम नवाजविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी शिफारस केली होती. नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो अध्यादेश 1999 खाली हा गुन्हा दाखल करावा, अशी शिफारस केली होती. नवाज शरीफ सरकारनं मात्र हा अहवाल नाकारला होता. (पान 1 वरून)  हे आपल्याविरोधातील षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला होता.  पनामा येथील एका लॉ फर्मनं काही गोपनीय कागदपत्रं लीक केली होती. त्यामुळे बडे राजकारणी, अतिश्रीमंत लोक आपल्याकडील काळा पैसा कसा सुरक्षित ठेवतात, हे समोर आलं होते. जगभरातील शोध पत्रकार त्यावर काम करीत होते. 128 राजकारणी आणि काही देशांच्या प्रमुखांची नावं पनामा पेपर्समध्ये आहेत. श्रीमंत व धनाढय नागरिक स्वतःची संपत्ती लपवण्यासाठी कशापˆकारे टॅक्स चोरतात, काय क्लुप्त्या लढवतात, यासंबंधीची माहिती अत्यंत गोपनीयतेनं काम करणार्‍या पनामाच्या मोसेक फोन्सेका कंपनीची महत्वपूर्ण व गोपनीय कागदपत्र लीक झाल्यानं ही माहिती उघड झाली होती. त्यात जगातील अनेक नेत्यांचा समावेश होता. या यादीत जगभरातील अनेक महत्वपूर्ण, धनाढय व्यक्ती, उद्योगपती, सेलिबिˆटी, राजकारण्यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत पाचशे भारतीयांचीही नावंदेखील आहेत. अमिताभ बच्चन व त्यांच्या कुटुंबीयांची नावं त्यात असली, तरी बच्चन कुटुंबीयांनी हे आरोप नाकारले आहेत. मोसेक फोन्सेका आपल्या गˆाहकांना काळा पैसा पांढरा करण्यासाठी तसंच नियमांमधून वाचवण्यासाठी आणि करातून सूट मिळावी, यासाठी कशा पˆकारे मदत करायची ही माहिती या कागदपत्रांमधून उघड झाली होती. ही कागदपत्र लीक झाल्यानं पाकिस्तानचे पंतपˆधान नवाज शरीफ, सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद, पाकिस्तानच्या माजी पंतपˆधान बेनजीर भुट्टो, इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक यांनीदेखील संपत्ती लपवण्यासाठी कशापˆकारे पनामाची मदत घेतली, हे जगासमोर आलं. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचं नावदेखील समोर आलं होते. पुतीन यांनी जवळच्या मित्रांची मदत करण्यासाठी पनामाचा वापर केल्याची माहिती उघड झाली होती. पˆसिद्ध फुटबॉलपटू लिओनोल मेस्सीचा देखील यामध्ये समावेश आहे.  पनामा पेपर्स नावाचं पˆकरण केवळ पाकिस्तानचे पंतपˆधान नवाज शरीफच नव्हे, त्यांच्या कुटुंबीयांभोवतीच घोंघावू लागल्यानं या पˆकरणात पुढं काय होणार, याची उत्सुकता केवळ पाकिस्तानातच नव्हे, तर जगभर होती. शरीफ उद्योगपती आहेत. पाकिस्तानातील पोलाद पˆकल्पांसह अनेक उद्योगांत त्यांनी दीर्घकाळ मोठी गुंतवणूक केली आहे. राजकारणात आल्यानंतर त्यांनी ज्ञात स्त्रोतांपेक्षा अधिक संपत्ती गोळा केली असून, ती परदेशांत विशेषतः टॅक्स हेवन म्हणून ओळखल्या जाणार्‍या कॅरेबियन देशांत गुंतवली आहे. बनावट कंपन्यांच्या मार्फत हा पैसा स्वीस बँकेसह युरोपीय देशांत गुंतवला गेल्याचं पˆकरण साधारण दोन वर्षांपूर्वी उघडकीस आलं आणि शरीफ आणि त्यांचं कुटुंबीय वादात सापडलं. या पˆकरणात पˆारंभी पाकिस्तानात फारसं काहीच घडलं नाही. तथापि, तेहरिक- ए- पाकिस्तानचे नेते इमˆान खान यांनी सातत्यानं हे पˆकरण लावून धरलं. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. नवाज आणि त्यांचे बंधू शाहबाज हे पाकिस्तानी राजकारण व उद्योग जगतातील बडे पˆस्थ. नवाज पंतपˆधान, तर शाहबाज पाकिस्तानातील सर्वांत महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या पंजाब पˆांताचे मुख्यमंत्री. सिंध, बलुचिस्तान, पंजाबसह व्याप्त काश्मिरात नवाज यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान मुस्लीम लीग हा पक्ष सत्तेवर आहे. अशा नेत्याला आव्हान देण्याचं धाडस इमˆान खान यांनी केलं होतं. एकाड्या शिलेदाराप्रमाणे त्यांनी ही राजकीय लढाई लढली. अर्थात त्यांना पाकिस्तानच्या लष्कराची पुरेपूर साथ होती. नवाज सध्या लष्कराला डोईजड होत असल्यानं लष्करानं इमˆान यांच्या पारड्यात आपलं वजन टाकलं होतं. सवोर्र्च्च न्यायालयाच्या निकालानं आता लष्कराचा हेतू साध्य झाला आहे. शाहबाज यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतरही आपल्या घरच्या व्यवसायातून अंग काढून घेतलेलं नाही. आता त्यांचं नाव पंतप्रधानपदासाठी घेतलं जात असलं, तरी आपल्या पदाचा गैरवापर करत त्यांनी काही उद्योगपतींकडून मोठी लाच घेतल्याचा आरोप इमˆान यांच्या पक्षानं केला आहे. त्यांनी लाहोर उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शाहबाज यांनीही इमˆान समथर्कांविरुद्ध अबˆुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यामुळं त्यांचं भवितव्यही सर्वोच्च न्यायालयाच्या हाती आहे. पाकिस्तानातील या अस्थैर्याचा गैरफायदा तेथील दहशतवादी संघटना उठवू शकतात. पाक लष्कर या दहशतवाद्यांचा वापर फक्त भारताच्या सीमेवरच नव्हे, तर अफगाणिस्तान व इराणच्या सीमेवरही करून घेत आहे. पुढील काळात हा वापर वाढण्याचा धोका आहे. तसंच, पाकिस्तानातील हिंसाचारातही यामुळं वाढ होऊ शकते. पाक लष्करातील एका गटाची चिंता आहे, ती पाकिस्तानातील हा वाढता हिंसाचार रोखायचा कसा हीच; पण आज तरी त्याचं उत्तर कोणाकडंच नाही. तूर्तास तरी पाकिस्तान पुन्हा अस्थिरतेकडं वाटचाल करू लागला आहे. बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपामुळं नवाझ शरीफ यांना आज पंतप्रधानपदावरुन पायउतार व्हावं लागलं असलं तरी, उद्योजकता हाच नवाझ शरीफ यांच्या राजकीय प्रवेशाचा पाया होता. त्याच राजकारणानं त्यांचा घात केला.