Breaking News

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून बहुमत सिद्ध!

पाटणा, दि. 28, जुलै - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विश्‍वासदर्शक ठराव जिंकला आहे. बिहारमधील नाट्यमय घडामोडीनंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान  झालेल्या नितीश कुमार यांनी आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलं. नितीश कुमार यांना 131 आमदारांचा पाठिंबा मिळाला तर 108 आमदारांनी त्यांच्याविरोधात मत  केलं. बिहार विधानसभेत एकूण आमदारांची संख्या 243 आहे. त्यामुळे इथे बहुमताचा आकडा 122 आहे.
दरम्यान, काल नितीश कुमार यांनी सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतली. तर भाजपचे सुशील मोदी बिहारचे नवे उपमुख्यमंत्री झाले आहेत. जदयू आणि  भाजपचे प्रत्येकी 14-14 मंत्री मंत्रिमंडळात असतील अशी माहिती मिळते आहे. नितीश कुमार यांनी काल (26 जुलै) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बिहारमध्ये  झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर भाजपने नितीश कुमारांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे भाजपची बिहारच्या सत्तेत पुन्हा एन्ट्री झाली आहे.