Breaking News

शिवसृष्टी प्रकल्प होण्याबाबत कोणाचेही दुमत नाही - महापौर मुक्ता टिळक

पुणे, दि. 30, जुलै - शिवसृष्टी प्रकल्प होण्याबाबत कोणाचेही दुमत नाही. मेट्रोच्या डेपोसाठी डीपीआरमध्ये असलेले स्थान याचा विचार करता महामेट्रोचे अधिकारी,  पालकमंत्री, इतर पक्षांचे नेते, गटनेते यांना बोलवून चर्चा करूया व त्यातून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी  शिवसृष्टी विषयावर आयोजित करण्यात आलेल्या महासभेत स्पष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारण केले. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणार्‍या  शिवसृष्टीमध्ये राजकारण करणे चुकीचे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि शिवसृष्टीसाठी सातत्याने आग्रही भूमिका मांडणारे दीपक मानकर यांनी व्यक्त  केले. हा प्रकल्प रखडायला केवळ प्रशासनाचा गलथानपणा जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला. आयुक्त कुणालकुमार अनुपस्थित असण्यावरही त्यांनी नाराजी  व्यक्त केली. एखाद्या टेंडरचा विषय असताना तर ते नक्की उपस्थित राहिले असते, असेही ते म्हणाले.