Breaking News

‘एपीजे अब्दुल कलाम स्मारका’चे पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन

रामेश्‍वरम, दि. 28, जुलै - भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मारकाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामेश्‍वरमधील पेई  कारूंबु येथे उद्घाटन करण्यात आले. डॉ. कलाम यांच्या दुस-या पुण्यतिथीच्या निमित्ताने या स्मारकाचे उद्घाटन झाले. या स्मारकातील डॉ. कलाम यांच्या  पुतळ्याचेदेखील मोदींनी अनावरण केले व डॉ. कलामांना आदरांजली वाहिली. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी डॉ. कलाम यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला व  स्मारकाजवळ राष्ट्रध्वजारोहण केले. पंतप्रधान मोदी यांनी स्मारकाच्या उद्घाटनानंतर ‘कलाम संदेश वाहिनी’ या विशेष बसला हिरवा कंदील दाखवला. ही बस संपूर्ण  भारतभर फिरून 15 ऑक्टोबरला कलाम यांच्या जयंतीच्या दिवशी राष्ट्रपती भवनात दाखल होणार आहे.