0
नवी दिल्ली, दि. 28, जुलै - बिहारमधील राजकीय घडामोडी देशाच्या दृष्टीने अशुभ संकेत देणा-या असल्याची टीका बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी  केली आहे. अशा घटनांमुळे जनतेचेच नुकसान होते. याने लोकशाहीचा पाया मजबूत व्हायच्या एवजी कमकुवत होतो. आता जनतेनेच पुढे सरसावून लोकशाहीला  बळकट करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. जनता तसे करू शकली नाही तर त्यामुळे जनतेचेच नुकसान होणार आहे. राजकीय पक्षांचे, नेत्यांचे काही नुकसान होणार  नाही, असे त्या म्हणाल्या.
मणिपूर व गोवा नंतर आता बिहारमधील राजकीय घडामोडींवरून हे सूचित होत आहे की, लोकशाहीचे भविष्य धोक्यात आहे. सरकारी प्रणालीचा दुरूपयोग केला जात  आहे. नितिश यांनी आपल्या निर्णयाने बिहारच्या जनतेचा विश्‍वासघात केल्याचेही त्या म्हणाल्या. बिहारच्या जनतेने मोदी लाटेविरूद्ध कल दर्शवला होता. त्यांच्या या  निर्णयाचा पाच वर्षांसाठी मान राखणे आवश्यक होते, असेही त्या म्हणाल्या.

Post a Comment

 
Top