Breaking News

डॉ. आंबेडकर स्मारक चैत्यभूमी येथे लवकरच भेट देणार असल्याचे राष्ट्रपतींचे आठवलेंना आश्‍वासन


नवी दिल्लीदि.29 : नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. देशभरातील आंबेडकरी जनतेतर्फे शाल पुष्पगुच्छ आणि भव्य पुष्पहाराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा सत्कार आणि अभिनंदन रामदास आठवले यांनी केले. यावेळी झालेल्या चर्चेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चैत्यभूमी स्मारक तसेच नागपूरमधील दीक्षाभूमी आणि मध्यप्रदेशातील महू येथील भीमजन्मभूमी स्मारक येथे लवकरच आपण भेट देणार असल्याचे आश्‍वासन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची आठवले यांनी अभिनंदनपर भेट घेतली त्यावेळी अर्धा तास विविध विषयांवर उभयतांमध्ये चर्चा झाली.
देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदी देशसेवा करण्याची आपणास संधी मिळाल्यामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार झाले असल्याचे सांगत आपणास राष्ट्रपतीपदाची संधी मिळाली. ती केवळ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीमुळे, असे मत राष्ट्रपती कोविंद यांनी व्यक्त केले. त्यामुळे लवकरच चैत्यभूमी दीक्षाभूमी आणि महू येथील भीमजन्मभूमी या भिमस्मारकांना लवकरच भेट देऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार असल्याचे राष्ट्रपतींनी आठवलेंकडे आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी दलित आदिवासी बहुजनांच्या आर्थिक सामाजिक उत्थानासाठी उभयतांमध्ये चर्चा झाली.