0
अहमदनगर, दि. 28 - तालुक्यातील मुंगी येथील गोदावरी नदीच्या पात्रात चोरट्या मार्गाने बेकायदेशीर अवैद वाळू उपसा सुरु असताना गुरूवारी महसूल व पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकून अठरा वाहने व साहित्य त्याचे यंत्रासह अवैध वाळू साठा छाप्यात जप्त केल्याने पथकाच्या ठोस धडक कारवाईमुळे वाळू तस्करांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.  
शेवगाव तालुक्यातील मुंगी येथील गोदावरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा असून  शासकीय अधिकृत लिलाव झाला नसताना महसूल व पोलीस प्रशासनाच्या छुप्या आशीर्वादाने चोरट्या मार्गाने बेसुमारपणे वाळूचा अवैध उपसा केला जात असतानाही महसूल विभाग ठोस कारवाई करण्याऐवजी वाळू तस्करांना छुपी मदत केली जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप होता गुरवारी महसूलच्या पथकाने फौजफाठ्यासह गोदावरी पात्रात अचानक छापा टाकून कारवाई केली पाथर्डीशेवगाव विभागाचे प्रांताधिकारी विक्रम बांदल, पोलीस उपअधिक्षक अभिजित शिवथरे शेवगावचे तहसिलदार दीपक पाटील, पोलीस निरिक्षक सुरेश सपकाळे ,मगर यांनी सकाळी मुंगी येथे जावून अवैध वाळू उपसा करणारे सतरा वाहने उपसासाठी लागणारे यार्‍याचे साहित्य जप्त करून व अवैधरीत्या उपसा केलेला वाळूचा साठा छाप्यात पोलिसांनी ताब्यात घेवून पंचनामा करण्यात आला आहे तर काही वाळू तस्करांनी वाहने साहित्य घेवून पलायन केले तर छाप्यात जप्त केलेली वाहने पथकांनी ताब्यात घेवून शेवगाव तहसील व पोलिस ठाण्यात आणण्यात आली आहे.

Post a Comment

 
Top