Breaking News

फक्त फोटो काढण्यापुरते झाडे लावु नका - डॉ.पंढरीनाथ गोरे

अहमदनगर, दि. 28 - मिरजगांव येथील भारत विदयालयामध्ये बुधवार दि. 26 जुलै 2017 रोजी वृक्षा रोपन व गॅस उदघाटनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना डॉ. गोरे म्हणाले आजपर्यत षासनाच्या आदेषा प्रमाणे अनेक वेळा वृक्षारोपनाचे कार्यक्रम घेण्यात आले झाडे लावतांना राजकीय सामाजीक मंडळी फोटो काढण्याच्या उद्देषाने मोठया संख्येने पुढे आलेले दिसतात परंतु वृक्ष संगोपणासाठी किती लोक पुढे येतात. झाडे हे षो पिस नाहीत तर जगण्यासाठीचे सर्वात मोठी नैसर्गीक षक्ती आहे.जगण्यासाठी लागणारा ऑक्सीजन फक्त झाडेच तयार करू षकतात. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रमेष झरकर होते तर या कार्यक्रमास मिरजगांव गटाचे जि.प.सदस्य गुलाबराव तनपुरे, मिरजगांवचे सरपंच नितिन खेतमाळस, उपसरपंच अमृत लिंगडे,माजी पंचायत समिती सदस्य तथा ग्रा.प. सदस्य डॉ. पंढरीनाथ गोरे,उध्दव म्हस्के,प्रभाकर घोडेस्वार, भगवान घोडके,दादा म्हेत्रे,बबन घोडेस्वार, श्रीमती अनभुले हरीदास केदारी,विजय पवार, अभंग बोरूडे, माजी सरपंच सारंग घोडेस्वार, अंकुष म्हेत्रे सह भारत विद्यालयाचे सर्व षिक्षक व षिक्षक्तेर कर्मचारी वृद तसेच षालेय विदयार्थी विदयार्थीनी मोठया संख्येने उपस्थीत होते यावेळी मिरजगांव गटाचे जि.प. सदस्य गुलाबराव तनपुरे म्हणाले आपल्याला जगण्यासाठी अन्न,वस्त्र, निवारा एवढयाच मुलभुत गरजा नसुन जगण्यासाठी स्वच्छ हवेची सर्वात जास्त गरज आहे त्यासाठी वृक्षारोपन तर आवष्यक आहे त्याच बरोबर त्याचे संगोपन होणे तितकेच गरजेचे आहे.प्रत्येकाने एक झाड दत्तक घेवुन त्याला जगवा ,पर्यावरणाचा -हास थांबवा की जेनेकरून भविशात आपल्या उत्तम आरोग्यासाठी स्वच्छ व निरोगी हवा मिळण्यास मोलाचे सहकार्य मिळेल तर अध्यक्षीय भाशणात डॉ. झरकर म्हणाले भारत विदयालयाचा चेहरा मोहरा बदलत आहे. विदयार्थ्यांच्या गरजा काय आहेत त्यांना स्पर्धेच्या काळात षिक्षण घेत असतांना त्यांच्या चांगल्या अरोग्याच्या दृश्टीने षालेय परीसरात मोठया प्रमाणात वृक्षारोपन आज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्याचे सांगीतले.