Breaking News

भाजपला‘अजिंक्य’ म्हणून नावारुपाला आणणे हे पुढील लक्ष्य - अमित शाह

लखनौ, दि. 30, जुलै - भारतीय जनता पक्षातील देशातील ताकद दिवसेंदिवस वाढत असून आता भारतीय जनता पक्षाला ‘अजिंक्य’ म्हणून नावारुपाला आणणे हे  पुढील लक्ष्य असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केले. उत्तर प्रदेशमधील पक्ष बैठकीत ते बोलत होते. उत्तर प्रदेशमधील सत्ता  मिळाली तेव्हा तेथील व्यवस्थापन विस्कळीत होते. मात्र, प्राधान्यक्रम ठरवून त्या आधारे जलदगतीने काम सुरू आहे. उत्तर प्रदेश सरकार पहिल्या दिवसापासूनच  लोकहिताचे काम करत आहे, असे ते म्हणाले.सत्तेवर आल्यावर तीन महिन्याच्या आत शेतक-यांच्या कर्जमाफीपासून गव्हाच्या विक्रमी खरेदीसारखी आश्‍वासने पूर्ण  करण्यात आली असून पाच वर्षाच्या कालावधीत उत्तर प्रदेश सरकार जाहिरनाम्यात नमुद करण्यात आलेली सर्व आश्‍वासने पूर्ण करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त  केला. जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे सरकार आपल्या कामातून घरोघरी पोहोचेल, असेही ते म्हणाले.