Breaking News

बिहार, गुजरातनंतर आता यूपीत भाजपच्या गळाला तीन आमदार?

लखनऊ, दि. 30, जुलै - भाजपकडून फोडाफोडीचे जोरदार राजकारण सुरु असल्याची चर्चा आहे. बिहार, गुजरातनंतर उत्तर प्रदेशातही राजकीय उलथापालथ  पाहायला मिळत आहेत. समाजवादी पार्टीच्या दोन आणि बसपच्या एका आमदारांने राजीनामा दिला असून ते तिघे भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले  जात  आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार बुक्कल नवाब यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. बुक्कल यांच्यासह  सपाचे आणखी एक आमदार यशवंत सिंह आणि बसपाचे जयवीर सिंह यांनीही आमदारकी सोडली आहे.
समाजवादी पक्ष आता एक पक्ष राहिलेला नाही तर तो आखाडा झालाय. माझी पक्षात घुसमट होत होती म्हणूनच मी पक्षाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा  राजीनामा दिल्याचे बुक्कल नवाब यांनी सांगितले.  राम मंदिर अयोध्येतच होणार असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  कामाचे कौतुक केले. भाजपने संधी दिल्यास आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असेही ते म्हणाले. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार हे यावरुन स्पष्ट होत असल्याची  चर्चा आहे.