Breaking News

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल बिजींगमध्ये दाखल

नवी दिल्ली, दि. 28, जुलै - ‘ब्रिक्स’ देशांतील सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आज बिजींगमध्ये  दाखल झाले. डोवाल (28 जुलै) चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपिंग यांची भेट घेणार आहेत. भारत आणि चीनमध्ये डोकलाम मुद्द्यावरून वाद सुरू असतांना अजित  डोवाल चीनच्या दौ-यावर आहेत.
डोकलाम भागातून भारताने माघार घेतल्याशिवाय भारताबरोबर कोणतीही चर्चा करणार नसल्याचे यापूर्वी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता लु कांग यांनी सांगितले  होते. त्यावर चर्चेपूर्वी दोन्ही देशांनी आपले सैन्य मागे घ्यावे असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संसदेत म्हटले होते. ‘ब्रिक्स’ देशांमध्ये ब्राझील, रशिया, भारत,  चीन, दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे.