Breaking News

आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यास केजरीवाल यांनीच सांगितले - जेठमलानी

नवी दिल्ली, दि. 29, जुलै - अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यास खुद्द मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते असा  दावा प्रसिद्ध विधिज्ञ राम जेठमलानी यांनी केला आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी अनेकदा अरुण जेटली यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे, असा  आरोपही जेठमलानी यांनी केला आहे.
अरुण जेटली यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर जेठमलानी यांनी स्वतःहुन केला असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी न्यायालयात सांगितले होते. त्यामुळे  नाराज असलेल्या जेठमलानी यांनी 20 जुलै रोजी पत्र पाठवून मुख्यमंत्री केजरीवाल यांचे वकीलपत्र सोडले असल्याचे जाहीर केले .
ते म्हणाले की, ज्या वेळेस अरुण जेटली यांनी पहिला खटला दाखल केला त्यावेळी केजरीवाल माझ्याकडे मी त्यांचे वकीलपत्र घ्यावे म्हणून आले होते. त्यावेळी  त्यांनी स्वत: कितीवेळा अरुण जेटली यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला हे त्यांनी स्वत: ला विचारावे, असे त्यांनी नमूद केले.