Breaking News

‘ओबामा केअर’ पॉलिसी संदर्भातील प्रस्ताव अमेरिकेच्या सिनेटने फेटाळला

वॉशिंग्टन, दि. 28, जुलै - ‘ओबामाकेअर’ पॉलिसी संदर्भातील प्रस्ताव अमेरिकेच्या सिनेटने फेटाळून लावला आहे.‘ओबामाकेअर’ या नावाने ओळखले जाणारी  किफायतशीर दरातील आरोग्य सेवा बंद व्हावी यासाठी सिनेटमध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र सिनेटमध्ये काल (26 जुलै) 55 मतांच्या बहुमताने हा  प्रस्ताव फेटाळण्यात आला.
सिनेटमध्ये आरोग्यसेवा कार्यक्रम राबविण्यासंदर्भात मतदान घेण्यात आले होते. या कार्यक्रम पत्रिकेवर 23 मार्च 2010 रोजी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी  स्वाक्षरी केली होती. ‘ओबामाकेअर’ अंतर्गत जवळपास दोन कोटी नागरिकांना याचा फायदा झाला होता. मात्र रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी या विधेयकाला विरोध  करत ही योजना रद्द करण्याची मागणी केली होती.