Breaking News

महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने निषेध सभा

। तर अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमदनगर, दि. 28 - महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी मधील कनिष्ठ तत्रज्ञ कर्मचारी राहुल डाके यांनी वरिष्ठ अधिकारींच्या जाचास कंटाळून आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारात गुरुवार दि.27 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली. अधिकार्यांच्या दबावाला बळी गेलेल्या कर्मचार्यास श्रध्दांजली वाहून, सदर अधिकार्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महावितरणचे कनिष्ठ तत्रज्ञ कर्मचारी राहुल डाके केडगाव चौफुला येथे कार्यरत असताना त्याचे वरिष्ठ अधिकारी रमेश पवार यांनी अतिरिक्त कामाचा बोजा व वसुलीचे दडपण टाकून त्यांना मानसिक त्रास दिला. या मानसिक त्रासला कंटाळून डाके यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचा आरोप संघटनेने केला असून, सदर पिळवणुकीमुळे आत्महत्या करत असल्याचे लेखी पत्र देखील मिळाले असल्याचे सांगण्यात आले आहे. भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी सदर अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपस्थितांनी केली. आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या अधिकार्यावर कारवाई होवून, मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न झाल्यास राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.