Breaking News

मसूर-उंब्रज परिसरातील अवैध दारूविक्री बंद करण्याची भूमाता ब्रिगेडची मागणी

कराड, दि. 30 (प्रतिनिधी) : कराड तालुक्यातील मसूर व उंब्रज परिसरातील गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री, मटका व गुटखा विक्री तातडीने बंद करण्याची मागणी भूमाता ब्रिगेड व परिसरातील महिलांनी सह्यांचे निवेदनाद्वारे तहसीलदार राजेंद्र शेळके व पोलीस उपअधीक्षकांकडे केली.
यावेळी भूमाता ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा माधुरी टोणपे, सुमन फाळके, चिखलीच्या सरपंच वंदना माळी, शोभा पवार, सुरेखा चव्हाण, सरिता चव्हाण, इंदू चव्हाण, मंगल सुतार, स्वाती जाधव, कल्पना पवार, सिंधू जाधव, स्वप्नाली माळी, कल्पना पवार, सिंधू जाधव, स्वप्नाली माळी, इंदू मोहिते, सुनिता चव्हाण, रेखा सुर्यवंशी, शारदा शिवचरण उपस्थित होत्या.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मसूर व उंब्रज परिसरातील अनेक गावात राजरोसपणे अवैध दारूविक्री होत आहे. तसेच परिसरात खुलेआम मटका व गुटखा विक्री होत आहे. सहजरित्या दारू उपलब्ध होत असल्याने युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.