0
लखनौ, दि. 29, जुलै - उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षातील विधान परिषदेच्या दोन सदस्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. बुक्कल नवाब आणि यशवंत सिंग यांनी  आज सकाळी विधान परिषदेच्या सभापतींची भेट घेऊन आपला राजीनामा सोपवला आहे. सपचा अन्य एक सदस्य राजीनामा देणार असून हे तीन सदस्य भारतीय  जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुक्कल नवाब हे राष्ट्रीय शिया समाजाचे संस्थापकही आहेत. या वेळी नवाब यांनी उत्तर प्रदेशचे  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली.

Post a Comment

 
Top