Breaking News

’इंदू सरकार’चा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाने प्रदर्शनाविरोधातील याचिका फेटाळली

नवी दिल्ली, दि. 28, जुलै - इंदू सरकार चित्रपटाविरोधातील याचिका फेटाळून लावत सर्वोच्च न्यायालयाने आज इंदू सरकार चित्रपट प्रदर्शित करण्याची अनुमती  दिली. त्यामुळे आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. चित्रपटात गांधी कुटुंबियांची प्रतिमा मलिन करण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट  प्रदर्शित करू नये, अशी मागणी याचिकेत केली गेली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.
काँग्रेस नेते संजय गांधी यांची कन्या असल्याचा दावा करणा-या प्रिया सिंग पॉल यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल  केली होती. इंदू चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. मात्र, काँग्रेस या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करत आहे.