Breaking News

भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला : रंगना हेराथ

गॉल, दि. 30, जुलै - भारताने श्रीलंकेवर मिळवलेल्या दणदणीत विजयाचे श्रेय संपूर्णपणे भारतीय खेळाडूंना जाते, असे मत श्रीलंकेचा हंगामी कर्णधार रंगना हेराथ  याने व्यक्त केले.
सामन्याच्या पहिल्या दिवसापासून भारताने उत्कृष्ट खेळ केला. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रात त्यांची कामगिरी आमच्यापेक्षा सरस होती. त्यामुळे या  विजयाचे संपूर्ण श्रेय हे भारतीय खेळाडूंनाच आहे. असेला गुणरत्नेसारख्या महत्वाच्या खेळाडूला झालेली दुखापत आम्हाला या सामन्यात महागात पडली. पण आम्ही  आमच्या खेळात सुधारणा करू आणि पुढच्या कसोटीत दमदार पुनरागमन करू, असा विश्‍वास हेराथने व्यक्त केला.
माझ्या बोटाला झालेली दुखापत हळूहळू बरी होत आहे. पूर्वी दुखावलेल्या बोटावरच पुन्हा मार लागल्याने थोडीशी काळजी वाटली. पण काही दिवसात ही दुखापत  पूर्णपणे बरी होईल, असेही हेराथने सांगितले. रंगना हेराथ आणि असेला गुणरत्ने दोघेही दुखापतीमुळे दुस-या डावात फलंदाजी करू शकले नव्हते.