Breaking News

‘एसआयएस’ची अद्ययावत तांत्रिक व मनुष्य बळ विकास करण्याची योजना

नवी दिल्ली, दि. 28, जुलै - देशातील सर्वांत मोठ्या सुरक्षा सेवा पुरवणा-या कंपन्यांपैकी एक असलेल्या सिक्युरिटीज ण्ड इंटेलिजन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड  (एसआयएस) या कंपनीने अद्ययावत तांत्रिक व मनुष्य बळ विकास करण्याची योजना तयार केली आहे.
यासाठी कंपनी 4 हजार 400 कोटी रूपये खर्च करणार आहे. या माध्यामातून पुढील दोन वर्षांत सर्वांत अत्याधुनिक व इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान आणण्याची कंपनीची  योजना आहे.
31 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत कंपनीने खुल्या बाजारातून 780 कोटी रुपये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून दीर्घ मुदतीच्या कर्जाची परतफेड  व व्यापक विकासात्मक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे ॠएसआयएस’चे नवी दिल्लीतील मुख्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय सिंग यांनी येथे सांगितले.
या योजनांमध्ये काही वर्षांपूर्वी एका अग्रगण्या लॉजिस्टीक कंपनी खरेदीसाठी केलेल्या 200 कोटी रुपयांच्या मागील कर्जाच्या परतफेडीचाही समावेश आहे.  सध्याॠएसआयएस’ कंपनीचे काम सुरक्षा सेवा, सुविधा व्यवस्थापन व कॅश लॉजिस्टीक्स या तीन भागांमध्ये विभागले आहे.
सध्या या कंपनीचे देशात सुमारे 95 हजार कर्मचारी व ऑस्ट्रेलियात 6 हजार कर्मचारी आहेत. गेल्या वर्षी कंपनीने 3 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय केला. हे  प्रमाण सरासरी वार्षिक आधारावर पाहिल्यास 30 टक्क्यांनी वृद्धी झाली आहे. अशा प्रकारे अन्य दोन संलग्न कंपन्यांचीही स्थिती आहे, असे सिंग यांनी सांगितले.
याशिवाय कंपनीने स्पॅनिश व अमेरिकन कंपन्यांसोबत आणखी तीन करार केले आहेत. यातून सुविधा व्यवस्थापन व कॅश लॉजिस्टीक्समध्ये अद्ययावतता आणत  देशभरात 18 प्रशिक्षण केंद्रे तयार केली आहेत. त्या माध्यमातून 32 हजार जणांना दरवर्षी प्रशिक्षण दिले जाते.
बिहारमध्ये सुरू झालेली एक छोटी कंपनी आता 31 जुलै रोजी शेअर बाजारात नोंदणीकृत होणार आहे, याचा अभिमान असल्याचे समूहाचे अध्यक्ष आर.के. सिन्हा  यांनी सांगितले.
कंपनी मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजारात नोंदणीकृत होणार आहे. ही कंपनी बिहारमधील नागरिकांच्या कल्याणासाठी काम करत राहील, असेही सिन्हा  म्हणाले.
गुजरातमधील गुंतवणुकदारांचे माहेरघर मानल्या जाणा-या राजकोट येथे समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रितूराज सिन्हा यांच्या विशेष उपस्थितीत येथे आज कार्यक्रम  संपन्न झाला. या वेळी ए.के. प्रसाद, संचालक (अर्थ), देवेश देसाई, मुख्य अर्थ अधिकारी (आंतरराष्ट्रीय व्यवहार) हेही उपस्थित होते. या प्रसंगी सिन्हा यांनी  गुंतवणूकदार, बाजार विश्‍लेषक व माध्यम प्रतिनिधींना ॠएसआयएस’च्या वैशिष्ट्यांची माहिती दिली.