Breaking News

जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ 100 बंकर खोदणार !

श्रीनगर, दि. 18, ऑगस्ट - नियंत्रण रेषेजवळ सतत होणा-या गोळीबारामुळे जम्मू-काश्मीर सरकारने 100 बंकर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सीमेपलीकडून  होणा-या गोळीबारामुळे हा निर्णय घेण्यात आला असून नौशेरा सेक्टरजवळ हे बंकर तयार करण्यात येणार असल्याची माहिती राजौरीचे उपायुक्त शाहिद इक्बाल  चौधरी यांनी दिली.
सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि तोफगोळ्यांचा मारा होत असतांना नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे बंकर तयार करण्यात येणार आहेत . या बंकर मध्ये 1200 ते  1500 लोक राहू शकतात. चौधरी यांच्या नेतृत्वाखालील एक पथक या बंकरकडे विशेष लक्ष देत आहेत.