0
चंदिगढ, दि. 18, ऑगस्ट - चंदिगढमधील 10 वर्षीय बलात्कार पीडित मुलीने काल एका बाळाला जन्म दिला. मुलीच्या आई-वडिलांनी तिच्या पोटात खडा  असल्याचं सांगून ऑपरेशनची परवानगी घेतली होती. यापूर्वीच हायकोर्टाने पीडित मुलाचा गर्भपात करण्यासंदर्भातील याचिका फेटाळली होती. यानंतर पीडित मुलीवर  चंदिगढच्या सरकारी रुग्णालयात ऑपरेशन करण्यात आलं, यावेळी तिने बाळाला जन्म दिला.
दरम्यान, पीडित मुलीवर उपचारासाठी कोर्टाने एका समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या अध्यक्षा डॉक्टर दसारी हरीश यांनी सांगितलं की, मुलीची प्रकृती  स्थिर असून, नवजात बाळाचं वजन थोडे कमी आहे. या पीडित मुलीवर तिच्याच काकांनी अनेक महिने बलात्कार केला होता. यामुळे त्या मुलीला गर्भधारणा झाली  होती.

Post a Comment

 
Top