Breaking News

कॉल ड्रॉप च्या मानकांचे उल्लंघन झाल्यास 10 लाखांपर्यंतचा दंड - ट्राय

नवी दिल्ली, दि. 19, ऑगस्ट - कॉल ड्रॉप साठी निश्‍चित केलेल्या मानकांचे सलग तिमाहीत एखाद्या टेलिफोन कंपनीकडून (ट्राय) पालन झाले नाही, तर संबंधित  कंपनीला 10 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल, असे निर्देश भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने आज जारी केले आहेत. कॉल ड्रॉप प्रकरणी 1 ते 5 लाख  रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या दंडाचा स्तर त्या त्या कंपनीच्या नेटवर्क प्रणालीवर अवलंबून असेल, असेही ॠट्राय’चे अध्यक्ष आर.एस.  शर्मा यांनी सांगितले.
जर एखाद्या ऑपरेटर कंपनीने सलग तिमाहीत कॉल ड्रॉपच्या मानके पूर्ण केली नाही तर दंडाच्या रकमेत दीड पटीने वाढ होईल. सलग तिस-या महिन्यात ही दुप्पट  होईल, असे ॠट्राय’चे कार्यवाहक सचिव एस.के. गुप्ता यांनी सांगितले. जास्तीतजास्त हा दंड 10 लाख रुपयांपर्यंत असेल.