Breaking News

एक दहशतवादी ठार झाला तर 10 दहशतवादी निर्माण होतील - मीरवाईज मौलवी उमर फारुख

श्रीनगर, दि. 19, ऑगस्ट - काश्मीर खो-यामध्ये दबावतंत्राचा वापर करुन शांतता प्रस्थापित होणार नाही. यात जर एक दहशतवादी ठार झाला तर उद्या नवीन 10  दहशतवादी निर्माण होतील, असे वक्तव्य हुर्रियत कॉन्फरन्सचे मीरवाईज मौलवी उमर फारुख यांनी केले. जामिया मशीदीमध्ये नमाज पठणाच्या पूर्वी ते बोलत होते.
भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला हा वाद जम्मू-काश्मीरच्या सव्वा कोटी नागरिकांच्या भावनांचा आणि आशेचा प्रश्‍न आहे. सामान्य काश्मीरी नागरिक 70  वर्षापासून या वादावर तोडगा निघण्याची वाट पाहत आहेत. या प्रश्‍नावर पडदा पडल्यास काश्मीरी नागरिकाच्या सर्व समस्या दूर होतील, असेही ते म्हणाले. दोन  महिन्यांच्या नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर मीरवाईज यांनी पहिल्यांदाच जनतेला संबोधित केले आहे.