Breaking News

डीएसकेंचा 1200 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा आरोप

मुंबई, दि. 19, ऑगस्ट - पुण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.  कारण की, डीएसकेंनी 1200 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
डी. एस, कुलकर्णी यांच्या डीएसके ग्रुपनं 1200 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप करत यासंबंधी मुख्यमंत्री, अर्थ मंत्रालय आणि झऋ आयुक्तांकडे  सोमय्यांनी तक्रार  केली आहे. तसेच यासंबंधी त्यांनी कारवाईची देखील मागणी केली आहे.