0
मुंबई, दि. 18, ऑगस्ट - मोबाईल कंपन्यांप्रमाणे बँकिंग क्षेत्रातही मोठी स्पर्धा सुरु असल्याचं दिसून येत आहे. त्यातल्या त्यात गृहकर्जाबाबतीत तर या स्पर्धेने टोक  गाठलं आहे. खासगी क्षेत्रातील आघाडीच्या अ‍ॅक्सिस बँकेने गृहकर्जदारांना तब्बल 12 मासिक हप्ते माफ करण्याची घोषणा केली आहे. मात्र त्यासाठी तुमचं गृहकर्ज 30  लाखांवर असायला हवं, शिवाय त्याचा एकही हप्ता तुमच्याकडून थकायला नको, अशी अट आहे.
अ‍ॅक्सिस बँकेने शुभारंभ ही नवी योजना आणली आहे. त्याअंतर्गत ही ऑफर देण्यात आली आहे. मात्र सलग वर्षभराचे हप्ते माफ होणार नाहीत, तर कर्जदाराने  नियमित कर्ज भरलं, तर त्याला चौथ्या, आठव्या आणि बाराव्या वर्षी असे चार-चार महिने सूट दिली जाईल. हे कर्ज घर खरेदी, दुरुस्ती, बांधकाम किंवा जमीन  घेऊन बांधकामासाठीच वापरता येऊ शकतं. या गृहकर्जाचा व्याजदर 8.35 % असेल. जर तुमचं दुसर्‍या बँकेत गृहकर्ज असेल, तर ते अ‍ॅक्सिस बँकेत वर्ग करण्याची  ऑफरही देण्यात आली आहे.

Post a Comment

 
Top