0
काझिरंगा, दि. 19, ऑगस्ट - उत्तर भारतातल्या पुराचं विदारक दृष्य समोर आलं. आसामच्या काझिरंगा अभयारण्यात 140 प्राण्यांचे मृतदेह आढळून आले. यंदा  आसामला दुसर्‍यांदा पुराचा फटका बसला. त्यामुळे 481 चौरस किलोमीटर भूभागात पसरलेल्या या अभयारण्याचा 80 टक्के भाग पुराच्या पाण्याखाली गेला.
10 पाणघोडे, 122 हरणं, दोन हत्ती, तीन जंगली अस्वलं, तीन सांबर यांचे मृतदेह आतापर्यंत आढळलेत. 10 ऑगस्टपासून दररोज प्राण्यांचे मृतदेह सापडत  असल्याचं काझिरंगातल्या अधिकार्‍यांनी सांगितलं. युनेस्कोचा जागतिक ठेवा असलेल्या काझिरंगा अभयारण्यात डिलफू या नदीचं पाणी शिरलं. 

Post a Comment

 
Top