Breaking News

गणेशोत्सवासाठी कोकणात जादा 1500 एसटी तर 256 रेल्वे

मुंबई, दि. 19, ऑगस्ट - कोकणात धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यासाठी मुंबईत कोणकणात जाणार्‍यांची संख्या मोठी असते. गणेशभक्तांची  गैरसोय होऊ नये म्हणून एसटी आणि कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे सोडण्यात आल्यात. यात  जादा 1500 एसटी तर  256 रेल्वे यांचा समावेश आहे.
गणेशोत्सवासाठी गावी जाणार्‍यांची गर्दी लक्षात घेता यावेळी जादा गाड्या सोडण्यात आल्यात.  रेल्वेच्या गाड्या दोन महिने आधीच फूल्ल होत असल्यामुळे  चाकरमान्यांना एसटीचा आधार असतो. त्यामुळे मुंबईहून येण्यासाठी 1500 जादा एसटी सज्ज आहेत. गतवर्षी 1350 गाड्या फूल्ल झाल्या होत्या. त्यामुळे यंदा 1500  गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. एसटीच्या जादा गाड्या मुंबईहून 22 तारखेपासून धावणार आहेत. 22 ते 24 या काळात जादा गाड्या असतील. यात  शिवशाही गाडीचाही समावेश आहे.
गणेशोत्सवासाठी ऑनलाईन आणि ग्रुप बुकींगची व्यवस्थाही करण्यात आलेय. 50 प्रवाशांचे बुकींग झाल्यास एसटी त्यांना गाडी उपलब्ध करुन देणार आहे. कोकण  रेल्वेमार्गावरही मोठ्या प्रमाणात जादा गाड्या सोडण्यात आल्यात. 256 जादा रेल्वे गाड्या धावणार आहेत. त्यामध्ये एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्यांचाही समावेश आहे.  कोकण रेल्वेच्या जादा गाड्या आजपासून धावणार आहेत.