0
पाटणा, दि. 19, ऑगस्ट - बिहारमधील पुराच्या तडाख्यात सापडलेल्या सीतामढी जिल्ह्यातून 15 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यास राष्ट्रीय आपत्ती निवारण  पथकाला यश आले आहे. राष्ट्रीय आपत्ती तपास पथकाने तीन तास शोधमोहिम आणि बचावकार्य सुरु ठेवले होते. काल (17 ऑगस्ट) बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर  बेहरा गावाजवळ एक नौका उलटल्याची माहिती मिळाली. यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले होते.
लखनदेई नदीचा प्रवाह जास्त असल्यामुळे नौकेत बसलेले नागरिक वाहून गेले होते. राष्ट्रीय आपत्ती पथकाने बचावकार्यात चार महिला, सहा पुरुष, आणि 5 लहान  मुलांचे प्राण वाचविल्याचे सांगण्यात येत आहे. बचावकार्य सुरु असतांना नौकेतील 14 व्यक्तींव्यतिरिक्त अन्य एका व्यक्तीदेखील प्राण वाचवण्यात आल्याचे  ‘एनड़ीआरफ’च्या नवव्या बटालियनचे कमांडर विजय सिन्हा यांनी सांगितले.

Post a Comment

 
Top