Breaking News

’मेट्रो रेल्वे पॉलिसी 2017’ला केंद्राची मंजूरी

नवी दिल्ली, दि. 16, ऑगस्ट - ’मेट्रो रेल्वे पॉलिसी 2017’ला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ही मंजुरी देण्यात आली  आहे. यासोबतच देशात सिंचनासाठी अतिरिक्त निधी देण्याचंही जाहीर करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची  बैठक पार पडली. या बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ’मेट्रो रेल्वे पॉलिसी 2017’ला मंजूरी मिळाल्याचं घोषित केलं. 
’मेट्रो रेल्वे पॉलिसी 2017’च्या माध्यमातून देशातील अनेक शहरांना मेट्रो नेटवर्कने जोडण्यात येणार आहे. राज्यांमध्ये होत असलेल्या मेट्रोच्या मागणीनंतर केंद्राने ही  पॉलिसी तयार केली आहे. रेल्वे मेट्रो प्रोजेक्टसाठी राज्याला 10 टक्के निधी हा केंद्र सरकारतर्फे देण्यात येणार आहे. राज्य सरकार स्वत:च्या बळावर मेट्रो रेल्वे  प्रोजेक्ट पूर्ण करू शकते. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मेट्रो प्रोजेक्टच्या माध्यमातून अनेक नोक-या उपलब्ध होणार आहेत. सध्या देशातील आठ शहरांमध्ये मेट्रो  पोजेक्ट्सवर काम सुरु आहे. ज्यामध्ये दिल्ली, बंगळुरु, चेन्नई, कोच्ची, मुंबई, जयपुर आणि गुडगाव यांचा समावेश आहे.