Breaking News

कार्ती चिदंबरम यांना 23 ऑगस्टला सीबीआय समोर हजर रहाण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली, दि. 19, ऑगस्ट - माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना 23 ऑगस्ट रोजी केंद्रीय अन्वेषण विभागासमोर हजर रहाण्याचे  आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सरन्यायाधीश जगदीश सिंग खेहर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने कार्ती यांना ॠलूकआऊट नोटीस’ बजावली होती. त्या आदेशाला 14 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती  दिली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयासमोर पुढील सुनावणी सुरू आहे.
कार्ती चौकशीसाठी हजर रहाण्यास तयार आहेत. मात्र त्यांना सोबत वकील घेऊन जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती कार्ती यांच्या वकिलांनी न्यायालयाला केली.  ती विनंती न्यायालयाने मान्य केली. 28 ऑगस्टपर्यंत कितीही वेळा चौकशी करण्याची सूट न्यायालयाने दिली आहे. पुढील सुनावणी 28 ऑगस्ट रोजी होणार आहे.