Breaking News

पाटणा-लखनौ थेट विमान सेवेला 24 ऑगस्टपासून प्रारंभ

लखनौ, दि. 18, ऑगस्ट - पाटणा-लखनौ थेट विमान सेवेला 24 ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. ही सेवा एलायन्स एअर बिहारने सुरु केली असून याचे संचलन  एअर इंडिया कंपनीकडून करण्यात येणार आहे. या थेट विमान सेवेमुळे पाटणाहून भोपाळला आणि जयपुरहून पाटणासाठी प्रवास करणे सुलभ होणार आहे.
एलायन्स एअरचे विमान11.50 ला लखनौहून रवाना होणार आहे. त्यानंतर ते 1.20 च्या सुमारास जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल. हे विमान  पाटणाहून दररोज 1.50 वाजता लखनौच्या दिशेने उड्डाण करून 3.30 ला पोहोचणांर असल्याचे सांगण्यात येत आहे.