Breaking News

कर्जमाफीसाठी 31 हजार ऑनलाईन अर्ज

सांगली, दि. 18, ऑगस्ट - राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शन्मान अर्थात शेतकरी कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानासाठी सांगली जिल्ह्यातील सुमारे  31 हजार शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. सांगली जिल्ह्यातील महा- ई सेवा केंद्र, सेतू, ग्रामपंचायत, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व खासगी  व्यावसायिक यांच्याकडून संबंधित शेतक-यांनी या कर्जमाफी योजनेचे अर्ज भरून घेतले आहेत.
राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानासाठी सांगली जिल्ह्यातील सुमारे दोन लाख 57 हजार शेतक-यांनी गत आठवडाभरात नोंदणी केली  होती. मात्र त्यातील 31 हजार 700 शेतक-यांनी नोंदणी केली आहे. या ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठीची शासकीय यंत्रणा अतिशय मंद गतीने सुरू असण्यासह जाचक  अटी व नियमांमुळे या कर्जमाफी योजनेला शेतक-यांतून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याची चर्चा आहे.
या ऑनलाईन अर्ज भरणा प्रक्रियेला गती येण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 218 पैकी 100 शाखेत बायोमेट्रिक यंत्रे उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे बँकेचे  अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सांगितले. याशिवाय महा- ई सेवा केंद्र, सेतू, विकास सोसायटी व अन्य व्यावसायिक यांच्या मदतीनेही शेतक-यांकडून ऑनलाईन अर्ज  भरणा केला जात आहे.