Breaking News

शहरातील 32 रुग्णालयांची अनाधिकृत बांधकामे पाडणार

महापालिकेने बजावल्या नोटिसा, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

अहमदनगर, दि. 18 - अनाधिकृत बांधकामे असलेल्या शहरातील 32 रुग्णालयांना महापालिकेने नोटिसा बजावल्याने या रुग्णालय चालकांमध्ये खळबळ उडाली  आहे. न्यायालयाने ही बांधकामे पाडावीत असा आदेश दिला आहे. महापालिकेने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.ही बांधकामे रुग्णालयाने 15 दिवसात काढून  घ्यावीत असेही आदेशात म्हट्ले आहे.
सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी दोन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयातून आता आदेश आल्यानंतर महापालिकेला  आता   कारवाई करण्याशिवाय पर्याय राहिल नाही. महापालिकेने सन 2010  ते सन 2014 दरम्यान वेगवेगळ्या टप्प्यात रुग्णालयांची इमारतीचे सर्वेक्षण केले होते. त्यात  121 रुग्णालयांचे बांधकामे अनाधिकृत आढळून  आले होते. त्यांना नोटिसा बजावून महापालिकेने सुनावणी घेतली होती. परंतु त्यानंतर पालिकेने कारवाई केली नाही.
त्यामुळे शेख यांना न्यायालयात जावे लागले. मनपाचे अनाधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश झालेली खासगी रुग्णालये अशी ःडॉ. सुरेश रच्चा, मोहनबाग, डॉ. संदीप  सुराणा, तारकपूर, डॉ. राहुल पंडित, स्टेशन रस्ता, डॉ. दरंदले (इमारत मालक शेख इम्रान, बुरूडगाव रस्ता )डॉ. दिपाली पटारे, झोपडी कॅन्टीनजवळ, डॉ. गजानन  काशीद, बालिकाश्राम रस्ता, डॉ. गणेश झरेकर डॉ. अनिल आठरे, डॉ. मॉरिस पारधी4 (इमारत मालक ज्ञानदेव आव्हाड, मनमाड रस्ता), आरोग्यदीप रुग्णालय  (इमारत मालक नारायण आव्हाड, मनमाड रस्ता )आधार मल्टीस्पेशल रुग्णालय, डॉ. गोल्हार (इमारत मालक ठाकूर नवलाणी), डॉ. अकोलकर रुग्णालय, बुरूडगाव  रस्ता, डॉ. मुंडे रुग्णालय (इमारत मालक संतोष जगताप)विश्‍वास नर्सिंग होम, डॉ. निलेश शेळके, बाजार समितीमागे, डॉ. प्रदीप आय रुग्णालय, दिल्लीगेट, डॉ. जयंत  गाडेकर, आनंदी बाजार, डॉ. केवळ रुग्णालय, माळीवाडा, डॉ. झावरे रुग्णालय, जुना बाजार, डॉ. तांबोळी रुग्णालय, घुमरे गल्ली, डॉ. हेंमत देशपांडे, लक्ष्मी कारंजा,  साई सुर्यनेत्रसेवा माणिक चौक, बडवे रुग्णालय, रामचंद्र खुंट, डॉ. बाबासाहेब कर्डिले, कल्याण रस्ता, डॉ.विलास जोशी, गुलमोहर रस्ता, डॉ. अतुल गुगळे, (इमारत  मालक शांता विघ्ने, कुष्टधाम (रस्ता)डॉ. प्रवीण डुंगरवाल, डॉ. शरद ठुबे, वैदुवाडी, डॉ. आगरवाल रुग्णालय, सावेडी रस्ता, डॉ. दीपक रुग्णालय, सावेडी रस्ता.