Breaking News

ढवळेश्‍वर येथे 35 मुलांना जंताच्या औषधातून विषबाधा

सांगली, दि. 19, ऑगस्ट - सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील वर येथे जागतिक जंतनाशक दिनानिमित्त औषध घेतलेल्या 35 मुलांना शुक्रवारी सव्वा एक  वाजण्याच्या विषबाधा झाली. यातील पाच मुले अत्यवस्थ असून त्यांना सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
शुक्रवारी जागतिक जंतनाशक दिनानिमित्त मुलांना जंताचे औषध देण्याचा कार्यक्रम ढवळेश्‍वर येथील अंगणवाडीत आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी औषध  प्राशन केलेल्या 35 मुलांना विषबाधा झाल्याने त्यांची प्रकृती खालावली. या मुलांना उलट्या, पोटात दुखू लागणे व गुंगी येऊ लागल्याने विटा येथील ग्रामीण  रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही सर्व मुले तीन ते पाच या वयोगटातील आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यातील पाच मुलांची प्रकृती अधिकच  खालावल्याने त्यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी या मुलांची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याचे हिंदुस्थान  समाचारशी बोलताना सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे नेते आमदार अनिल बाबर, भाजपचे नेते सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, उपाध्यक्ष सुहास बाबर व  सांगली जिल्हा आरोग्य अधिकारी राम हंकारे यांनी तात्काळ विटा ग्रामीण रूग्णालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली व त्यांच्या पालकांना धीर दिला.