Breaking News

अकोला-खामगाव मार्गावरील भीषण अपघातात 4 ठार

बुलडाणा, दि. 16, ऑगस्ट - बुलडाणा जिल्ह्यातील अकोला-खामगाव मार्गावर झालेल्या भीषणअपघातात चार जणांचा मृत्यू झाला. इतर तर सहा जण जखमी  झालेत. ही घटना आज, बुधवारी 16 ऑगस्ट रोजी घडली. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भरधाव ट्रकने आटो रिक्षाला जबर धडक दिल्याने हा अपघात  झाला. या अपघातात चार जण जागीच ठार झाले असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अकोला- खामगाव मार्गावर सकाळी 11.50 वाजता घडली. या  घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली होती.
यासंदर्भात हाती आलेल्या माहितीनुसार बुलडाणा येथील ईक्बाल चौक परिसरात राहणारे मजूर कामासाठी बाळापूर इथे जात होते. यावेळी अ‍ॅपे रिक्षातून एकूण दहा  प्रवासी प्रवास करत होते. त्याचवेळी अकोला - खामगाव या मार्गावरील टेंभूर्णा फाट्यावर या रिक्षाला ट्रकनं जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की,  रिक्षातील चौघा प्रवाशांचा जागीच मृत्यु झाला. गंभीर जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. या अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला होता. मात्र, खामगाव ग्रामीण  पोलिसांनी नाकाबंदी करून ट्रक चालकासह ट्रक ताब्यात घेतले आहे.